नैराश्याला कंटाळून तरुणाची विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 19:37 IST2021-01-19T19:36:00+5:302021-01-19T19:37:12+5:30
लना शहरातील सदरबाजार ईदगा गोल्डन ज्युबली शाळेजवळील एका बंद असलेल्या विद्युत खांबाला गळाफास घेऊन आत्महत्या केली.

नैराश्याला कंटाळून तरुणाची विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या
जालना : अहमदनगर जिल्ह्यातील मळेगाव येथील एका २८ वर्षीय तरूणाने नैराश्याला कंटाळून विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना शहरातील सदर बाजार ईदगा गोल्डन ज्युबलीजवळ सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. प्रदीप शशिकांत गुडघे (३२ रा. मु.पो. मळेगाव थडी ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे मयताचे नाव आहे.
प्रदीप गुडघे हा पिंपरी चिंचवड येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. पिंपरी चिंचवड येथे तो रूम करून राहत होता. १३ जानेवारी रोजी नैराश्यातून तो रूममधून निघून गेला. याप्रकरणी त्याच्या घरच्यांनी पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याचा शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. सोमवारी दुपारी जालना शहरातील सदरबाजार ईदगा गोल्डन ज्युबली शाळेजवळील एका बंद असलेल्या विद्युत खांबाला त्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली.
याची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना कळविली. पोउपनि सय्यद व पोना खार्डे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह काढला. मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. याची माहिती प्रदीपच्या घरच्यांना देण्यात आली. सायंकाळी त्याचा मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी सय्यद मुस्ताक सय्यद (रा. रहेमानगंज जालना) यांच्या फिर्यादीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.