शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुण ठार; एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:28 IST

विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन -जाफराबाद मार्गावरील विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला.तर या अपघातात दीपक छगनराव देशमुख (३३ रा. पिंपळगाव रेणुकाई) हा गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान नीलेश नरवडे व दीपक देशमुख हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच २८ ए. डब्लू ५४३४ या गाडीवर भोकरदनकडून पिंपळगाव रेणुकाई या आपल्या गावाकडे जात असताना विरेगाव जवळच्या पुलाजवळ जाफराबाद कडून भोकरदन कडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराने धडक दिली. नीलेश जागीच ठार झाला.दीपक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात डॉ कल्याणी बडवे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद ला हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी गणेश पायघन, सूर्यवंशी, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भोकरदन पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातात मयत झालेला नीलेश नरवडे हा पिंपळगाव रेणुकाई येथील उपसरपंच पंडितराव नरवडे यांचा मुलगा आहे.गेल्या काही महिन्यांपासून भोकरदन तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याने चिंतेचा विषय बनला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू