पुणेकर प्रेयसी प्रियकराच्या शोधात भोकरदनला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:37 IST2017-12-18T01:12:41+5:302017-12-18T11:37:28+5:30
भोकरदन तालुक्यातील प्रियकराचा शोध घेण्यासाठी पुण्याची २३ वर्षीय पे्रयसी रविवारी पहाटे भोकरदन शहरात पोहोचली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रस्त्यावरून जाणा-या या युवतीकडे चौकशी केली आणि हा प्रकार समोर आला.

पुणेकर प्रेयसी प्रियकराच्या शोधात भोकरदनला!
भोकरदन : तालुक्यातील प्रियकराचा शोध घेण्यासाठी पुण्याची २३ वर्षीय पे्रयसी रविवारी पहाटे भोकरदन शहरात पोहोचली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रस्त्यावरून जाणा-या या युवतीकडे चौकशी केली आणि हा प्रकार समोर आला.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की भोकरदन तालुक्यातील करजगाव येथील एक २४ वर्षीय युवक पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. या काळात त्याची ओळख हॉस्पिटलमध्ये काम करणाºया या युवतीशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने दोघेही एकत्र संसाराची स्वप्ने पाहू लागले. दोघांच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रेमाबाबत कळल्यानंतर मुलीचे नातेवाईक काही दिवसांपूर्वी करजगावला आले. मात्र, त्यांनी मुलाची परिस्थिती पाहून न थांबताच निघून जाणे पसंत केले. यामुळे नाराज मुलाने पुण्यातील नोकरी सोडून तो औरंगाबादमध्ये काम करू लागला. दरम्यान दोघेही अधून-मधून भेटायचे. मात्र, तीन दिवसांपासून सदर युवकाशी फोनवर संपर्क न झाल्यामुळे पे्रयसी बेचैन झाली.