ज्ञान प्राप्तीसाठी तपस्या करावी लागते : रामराव महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:33+5:302021-02-25T04:37:33+5:30
घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथे आयोजित हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. प्रत्येक माणूस जन्मापासून मरेपर्यंत प्रपंच करत असतो. परंतु ...

ज्ञान प्राप्तीसाठी तपस्या करावी लागते : रामराव महाराज
घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथे आयोजित हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. प्रत्येक माणूस जन्मापासून मरेपर्यंत प्रपंच करत असतो. परंतु तसा परमार्थ करत नाही. प्रपंचातील रस्ता कधीच संपत नाही. पण परमार्थात रस्ता संपतो. त्यामुळे परमार्थात रमले पाहिजे. प्रपंच करत असताना जीवन संपते. सध्याच्या काळात अभक्ताची संख्या जास्त आहे. तशी भक्ताची संख्या अत्यल्प आहे. ज्याच्या अंत:करणात परमार्थाविषयी भक्ती नाही, तो अभक्त मानला जातो. भगवंत प्राप्तीकरिता मानवी जीवन आहे, त्याकरिता हा देह आहे. जो भगवंताची निष्काम श्रद्धेने भक्ती करतो, तोच भक्त असतो, असेही रामराव महाराज यांनी सांगितले. यावेळी गायन साथसंगत बाळासाहेब महाराज मोरे, नारायण महाराज तनपुरे, दिवाकर महाराज ढवळे यांनी केली. कार्यक्रमास परिसरातील भाविकांची उपस्थिती हाेती.
फोटो