योगेश कोथळकर यांची उपाध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:05+5:302021-09-04T04:36:05+5:30
गवळी पोखरी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन जालना : तालुक्यातील चितळी-पुतळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर ...

योगेश कोथळकर यांची उपाध्यक्षपदी निवड
गवळी पोखरी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जालना : तालुक्यातील चितळी-पुतळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुधंती शिरसाठ, दीपक डोके, भालचंद्र भोजने, सरपंच राजेंद्र वांजुळे, गणेश शिंदे, आसाराम आहीरे, गंगाधर पारखे, गोरखनाथ माळी, प्रसाद पारखे, संतोष उमप आदींची उपस्थिती होती.
बालाजी शिंदे यांची अध्यक्षपदी निवड
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे सरपंच रेणुका दुधे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा हाेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात ग्रामविकास अधिकारी एस. बी. साळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बालाजी शिंदे यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच रेणुका दुधे, रामभाऊ दुधे, उपसरपंच नामदेव सरोदे, सुनील सरोदे, सभापती विनोद गावंडे, सिद्धेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणेश ठाले, रमेश हिंगे, मुक्तार बागवान आदींची उपस्थिती होती.
जैन संघटनेतर्फे ऑनलाईन मेळावा
जालना : भारतीय जैन संघटनेच्या वतीने समाजातील विवाह इच्छुक विधवा - विधुर, अपंग - विकलांग व घटस्फोटितांच्या पुनर्विवाहच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरीय परिचय मेळावा १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असून, इच्छुकांनी १० सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले आहे.
रोग निदान शिबिरास प्रतिसाद
मंठा : तालुक्यातील हेलस येथे नुकतेच मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर पार पडले. नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ग्रामपंचायतच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, सिंहगड इन्स्टिट्यूटचे चेअरमन पी. एन. यादव, डॉ. आशिष राठोड, गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, प्राचार्य सचिन राठोड, सरपंच पांडुरंग खराबे, माऊली वायाळ आदींची उपस्थिती होती.
लहू शस्त्र सामाजिक संघटनेची बैठक
जाफराबाद : लहू शस्त्र सामाजिक संघटनेची बैठक सेना प्रमुख संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष रामभाऊ ससाने, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काकफळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला सुनील काकफळे, अशोक म्हस्के, सुनील ससाने, सुशिला खंडागळे, ज्ञानेश्वर निकाळजे, संतोष सगट, कृष्णा खंदारे, अनिल ससाने, संजय म्हस्के, संदिप निकाळजे, सुखदेव कांबळे, गणेश साबळे आदी उपस्थित होते.
विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त
जालना: शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर ही याचा विपरित परिणाम होत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.
बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी
अंबड : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय अंधाराचा फायदा घेत भुरटे चोर ठिकठिकाणी चोऱ्या करीत आहेत. नगर पंचायतीने शहरातील बंद पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.