सीताबाई मोहिते यांना यशवंत प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:30+5:302021-02-11T04:32:30+5:30
यावेळी यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक भागवत, सचिव श्रीहरी तिकांडे, डॉ. मुरली जाधव, राजेंद्र मुळ, श्रीहरी शिरसाट, शशिकांत ...

सीताबाई मोहिते यांना यशवंत प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
यावेळी यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक भागवत, सचिव श्रीहरी तिकांडे, डॉ. मुरली जाधव, राजेंद्र मुळ, श्रीहरी शिरसाट, शशिकांत बर्वे, उद्धव बाजड यांची उपस्थिती होती. २० ते २२ फेब्रुवारी २०२१ दरम्यान होणाºया यशवंत व्याख्यानमालेत सदरील पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संजय खोरे यांनी सांगितले आहे. यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर यशवंत व्याख्यानमाला आयोजित केली जाते. तसेच मागील तीन वर्षांपासून कला, साहित्य, समाजसेवा, कृषी, राजकारण आणि वैद्यकीय सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया व्यक्ती अथवा संस्थांना यशवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर, लोककला अकादमीचे संचालक प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे, पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे यांना यशवंत पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.