लोकसहभागातून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:24+5:302021-03-04T04:57:24+5:30
अभिवादन कार्यक्रम परतूर : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास रामदास जाधव, अतिश ...

लोकसहभागातून काम
अभिवादन कार्यक्रम
परतूर : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास रामदास जाधव, अतिश जाधव, आकाश गरडवाल, राजू बासनवाल, अरुण गायकवाड, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.
सूचनांचे पालन करा
जालना : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, पुन्हा लॉकडाऊन लागणे परवडणारे नाही. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले आहे.
भीमशक्तीचे निवेदन
मंठा : अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने नववी व अकारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारे त्यांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी भीमशक्ती विद्यार्थी आघाडीच्या वतीने जीवन भदरगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ठिकठिकाणी स्वच्छता
जालना : शहरातील भाग्यनगर व परिसरातील मुख्य रस्त्यावर अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे पालिकेने गरजेनुसार कचराकुंडी ठेवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे.