शिक्षकांचे काम समाज उभारणीचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:19 IST2017-12-14T00:18:44+5:302017-12-14T00:19:04+5:30
जो शिक्षक संपूर्ण आयुष्य अध्ययन आणि अध्यापनात व्यतीत करून नवसमाज निर्माण करण्याचे कार्य करतो. त्या शिक्षकांचे निवृत्तीनंतरही समाज उभारणीचे काम अविरतपणे सुरू असते, शासनाच्या वयाच्या निकषानुसार ते सेवानिवृत्त होतात. परंतु त्यांचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते, असे प्रतिपादन आ. विक्रम काळे यांनी केले.

शिक्षकांचे काम समाज उभारणीचेच
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : जो शिक्षक संपूर्ण आयुष्य अध्ययन आणि अध्यापनात व्यतीत करून नवसमाज निर्माण करण्याचे कार्य करतो. त्या शिक्षकांचे निवृत्तीनंतरही समाज उभारणीचे काम अविरतपणे सुरू असते, शासनाच्या वयाच्या निकषानुसार ते सेवानिवृत्त होतात. परंतु त्यांचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते, असे प्रतिपादन आ. विक्रम काळे यांनी केले.
स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका शोभा डहाळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजी मदन, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा सभापती (पान २ वर)
कपिल आकात, प्रा. नारायण बोराडे, प्राचार्य भगवान दिरंगे, प्रा. सुखदेव मांटे, प्रा. सदाशिव कमळकर, प्राचार्य भारत खंदारे, भाऊसाहेब गोरे, अंकुशराव मोरे, पंकज बोराडे, बळीराम कडवे, बबनराव गनणे, भाऊसाहेब कदम यांची उपस्थिती होती.
आकात म्हणाले, प्रा. डहाळे यांचे कार्य संस्थेच्या गुणात्मक वाढीसाठी भरीव आहे. यावेळी उपप्राचार्य ए. डी. खरात, प्रा. अच्युत मगर, प्रा. एस. आर. चव्हाण, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. सनी काकडे, प्रा. मिलींद कुलकर्णी, प्रा. सुभाष खराबे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.