त्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:21+5:302021-01-08T05:41:21+5:30

अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ...

Work on that road finally began | त्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

त्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत लोकमतनेही अनेकवेळा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे.

अंबड तालुक्यातील हस्तपोखरी -कर्जत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांंमुळे रस्त्यावरून वाहने चालविणेही अवघड झाले असून दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली होती. परंतु, संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. याबाबत लोकमतनेही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दीड किलोमीटरच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Work on that road finally began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.