तलावाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:17+5:302021-02-13T04:29:17+5:30
श्रीराम मंदिरासाठी ११ हजारांचा निधी जालना : अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी ११ हजार रुपयांचा निधी देण्यात ...

तलावाचे काम रखडले
श्रीराम मंदिरासाठी ११ हजारांचा निधी
जालना : अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी ११ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. अंबड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात ११ हजाराचा धनादेश मंदिराचे उपाध्यक्ष इंद्रजित गिराम, सचिव केदारमंत्री, तुकाराम तौर, पंढीनाथ जाधव, पुजारी देशमुख, पुरुषोत्तम ढोले, दीपक चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
वालसावंगी : येथील मुख्य सिमेंट रस्त्यावरून गावात येत असताना गुरुवारी सकाळी भरधाव वाहनाच्या धडकेत शुभम गवळी हा दुचाकीस्वार युवक जखमी झाला. त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हालविण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. येथील रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.
बाजारात जुगार खेळण्याऱ्या अटकेत
शहागड : साष्टपिंपळगाव येथील आठवडी बाजारात जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून सोरट नावाचा जुगार खेळणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. लक्ष्मण अर्जुन डाखूरकर असे संशयित आरोपीचे नाव आहेत. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी गोपनीय शाखेचे महेश तोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे निवेदन
जालना : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले. या निवेदनावर राज्यामध्ये वर्ग दोनच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना सरसकट ४,३०० रुपये ग्रेड वेतन श्रेणी देण्यात यावी, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भोकरदन तालुक्यात मका काढणीला वेग
भोेकरदन : तालुक्यातील शेतशिवारात मका काढणीला वेग आला आहे. अधूनमधून ढग दाटून येत असल्याने पावसाच्या धाकाने शेतकरी सकाळपासून शेतात काढणीच्या कामाला लागत आहेत. तालुक्यातील सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाची काढणी सुरू आहे. खरीप हंगामातील मका सोंगणी करून शेतकऱ्यांनी गंजी ठेवली होती. भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी होते.
संत शिरोमणी रविदास जयंतीची पूर्वतयारी
जालना : संत शिरोमणी रविदास जयंती दि. २७ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून, त्यासाठी उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी राजन कुरील यांची, तर सचिवपदी संजय बन्सवाल, स्वागताध्यक्षपदी ॲड. दशरथ इंगळे यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अवैध धंदे बंद करण्याची मागणी
जालना : शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. ते तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी झुंजार छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात जुगार, अवैध दारू, गुटखा विक्रीसह इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हे धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
जामखेड येथे दीड एकर ऊस जळाला
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील शेतकरी अर्जुन सांगुळे यांचा गट नंबर ५६८ मधील दीड एक ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संबंधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. वीज कर्मचारी व तलाठी गवते यांनी तातडीने अर्थिक मदत मिळवून देऊ, असे सांगितले आहे.