वर्षभरापासून मुख्य रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:03+5:302021-02-26T04:44:03+5:30

जाफराबाद : शहरातील नऊशे मीटरच्या मुख्य सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन नऊ महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम ...

Work on the main road has been stalled for over a year | वर्षभरापासून मुख्य रस्त्याचे काम रखडले

वर्षभरापासून मुख्य रस्त्याचे काम रखडले

जाफराबाद : शहरातील नऊशे मीटरच्या मुख्य सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन नऊ महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. शहरातील इतर चौकांमधील कामे न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जाफराबाद शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच चालला आहे. लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. असे असताना शहराचा विकास मात्र खुंटलेला दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे काम करण्यास काही सामाजिक कार्यकर्ते, संघटना अडथळा निर्माण करीत असल्याची चर्चा आहे. खरे तर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. उलट अडचणी कशा निर्माण होतील याला जास्त महत्त्व दिले जात आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून व्यापारी, सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यातच सध्या शहरात सिमेंट नाल्यांचे काम सुरू आहे. या कामातसुद्धा अडथळे निर्माण केल्या जात आहे. शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

===Photopath===

250221\25jan_18_25022021_15.jpg

===Caption===

जाफराबाद येथे रस्त्याचे काम असे अपुर्ण आहे.  

Web Title: Work on the main road has been stalled for over a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.