राष्ट्रीय जडण-घडणीमध्ये महिलांचे योगदान मोलाचे : सिवा नागाराजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:27+5:302021-02-05T08:01:27+5:30
राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा जालना : राष्ट्रीय जडण-घडणीमध्ये महिलांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन प्रवर अधीक्षक सिवा नागाराजू ...

राष्ट्रीय जडण-घडणीमध्ये महिलांचे योगदान मोलाचे : सिवा नागाराजू
राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा
जालना : राष्ट्रीय जडण-घडणीमध्ये महिलांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन प्रवर अधीक्षक सिवा नागाराजू यांनी केले. जालना शहरातील मुख्य टपाल कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रॅलीदेखील काढण्यात आली होती. यात १००पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते, असे पोस्टमास्तर गणेश पारीपेल्ली यांनी सांगितले. मुलींना पुस्तिका शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले.
पुढे बोलताना नागाराजू म्हणाले की, महिलांविषयी प्रत्येकाने आदर बाळगायला हवा. त्या समाज जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा प्रत्येकाने सन्मान करायला हवा, असेही ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोस्टमास्तर एस. बी. भुजाडे, पासपोर्ट अधिकारी डी. डी. खैरे, आर. बी. गवळी, लेखा व्यवस्थापक पौर्णिमा गोटखिंडीकर, के. आर. ससे, देशमुख, जब्बार खान आदींनी परिश्रम घेतले.
फोटो
टपाल कार्यालयात बालिका दिन साजरा करण्यात आला.