महागाईच्या विरोधात महिला काँग्रेसची जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST2021-07-10T04:21:41+5:302021-07-10T04:21:41+5:30
जालना : महागाई, इंधन दरवाढीविरोधात जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ...

महागाईच्या विरोधात महिला काँग्रेसची जोरदार निदर्शने
जालना : महागाई, इंधन दरवाढीविरोधात जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. उपजिल्हाधिकारी नेटके यांना देण्यात आलेल्या निवेदनासोबत केंद्र सरकारला शेणाच्या गौऱ्या पाठविण्यात आल्या.
याप्रसंगी अ.भा.कॉ. सदस्य भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, विजय कामड, सत्संग मुंढे, आर. आर. खडके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विमल आगलावे, सुषमा पायगव्हाने, शीतल तनपुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विमल आगलावे म्हणाल्या की, मोदी सरकारच्या राज्यामध्ये सर्व जाती घटकाचे लोक संकटात सापडले असून, सरकारची उज्वला योजना पूर्णपणे फोल ठरली आहे. महिलांना लाकूड आणि गौऱ्यावर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे मोदी सरकारला शेणाच्या गौर पाठवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी नेटके यांना दिलेल्या निवेदनात देशात वाढलेली महागाई कमी करावी, शेतकऱ्यांविरुद्ध केलेले कायदे रद्द करावे आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अंकुश राऊत, आनंद लोखंडे, दिनकर घेवंदे, डॉ. विशाल धानुरे, धर्मा खिल्लारे, नवाब डांगे, चंद्रकांत रत्नपारखे, नंदा पवार, अशोक उबाळे, फकिरा वाघ, राधाकिशन दाभाडे, बालकृष्ण कोताकोंडा, रहिम तांबोळी, डॉ. सुभाष ढाकणे, विजयश्री ढाकणे, प्रमिला सूर्यवंशी, गंगा काळे, मंगल खांडेभराड, रघुवीर गुढे आदींची उपस्थिती होती.