फुलेंचा आदर्श घेऊन महिलांनी प्रगती करावी -शेजूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:03+5:302021-01-04T04:26:03+5:30

जालना तालुक्यातील रामनगर येथे ग्रामपंचायत, क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (दरेगाव) आणि महिला आर्थिक उन्नती मंडळ, रामनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Women should make progress by following the example of flowers | फुलेंचा आदर्श घेऊन महिलांनी प्रगती करावी -शेजूळ

फुलेंचा आदर्श घेऊन महिलांनी प्रगती करावी -शेजूळ

जालना तालुक्यातील रामनगर येथे ग्रामपंचायत, क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (दरेगाव) आणि महिला आर्थिक उन्नती मंडळ, रामनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रामनगर ग्रामपंचायत कार्यालयातात महिला मेळावा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे महाप्रबंधक तेजल क्षीरसागर, महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस निरीक्षक एस. राठोड, सरपंच स्वाती शेजूळ, मनोहर सरोदे, गणेश गव्हाणे, विष्णू पिवळ, उषा शिंदे, अयोध्या टेमकर, संतोष थेटे यांची उपस्थिती होती.

महिलांनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता एकमेकींना सहकार्य करत सामोरे गेले पाहिजे, यासाठी सर्व कायदे व प्रशासन महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभे असल्याचेही शेजूळ म्हणाले. पोलीस निरीक्षक राठोड म्हणाल्या, महिलेवर कुठे अन्याय होताना दिसला, तर न घाबरता तातडीने पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली पाहिजे. आज प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. शिवाय मुलींकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने मुलींना स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. नाबार्डचे क्षीरसागर, विष्णू पिवळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Women should make progress by following the example of flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.