महिला आरक्षण सोडत लांबणीवर; सदस्यांची धाकधूक कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:10+5:302021-02-05T08:00:10+5:30
त्यामुळे आता महिलांसह गाव कारभाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सरपंचपदाचे बाशिंग बांधून असणाऱ्यांचा हिरमोड झाला ...

महिला आरक्षण सोडत लांबणीवर; सदस्यांची धाकधूक कायम
त्यामुळे आता महिलांसह गाव कारभाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सरपंचपदाचे बाशिंग बांधून असणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. सुरुवातीपासून सरपंचपदाच्या आरक्षणावरून ग्रामपंचायत निवडणुका चांगल्याच गाजत राहिल्या. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शासनाने आरक्षण जाहीर केले होते. परंतु, ते आरक्षण रद्द करण्यात आले. नुकत्याच जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात ४१४४ उमेदवार विजयी झाले. यात तब्बल २३२२ महिला उमेदवारही सहभागी झाल्या होत्या. आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे होते. त्यानुसार २८ जानेवारी रोजी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत झाली. महिला आरक्षण सोडत ही १ फेब्रुवारी रोजी होणार होती. परंतु, शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बैठक घेऊन काही कारणास्तव महिला आरक्षण सोडत लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.