जालना येथील महिलांना पुरुषांएवढेच ‘टेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:53+5:302021-01-08T05:41:53+5:30
पती-पत्नीत दोघांमध्येही ब्लेड प्रेशरचे प्रमाण सारखेच असल्याने कुटुंबात भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण प्रचंड तणावाखाली ...

जालना येथील महिलांना पुरुषांएवढेच ‘टेन्शन’
पती-पत्नीत दोघांमध्येही ब्लेड प्रेशरचे प्रमाण सारखेच असल्याने कुटुंबात भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण प्रचंड तणावाखाली काम करीत आहे. त्यात आता कोरोनाच्या संकटामुळे ब्लेड प्रेशरचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नोकरी व भविष्याच्या चिंतेने पुरुषांना ग्रासले आहे, तर महिलाही वेगवेगळ्या कारणांवरून मानसिक तणावात आहेत. त्यासाठी अनेक जण डॉक्टरांचे सल्ले घेत असल्याचे सांगण्यात आले.
रक्तदाब वाढण्याचे कारण
सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यातच नोकरीची अनिश्चितता असल्यामुळे आजघडीला प्रत्येक जण मानसिक तणावाखाली जगत आहे.
काय काळजी घ्यावी
ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी नागरिकांनी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीची चिंता वाटल्यानंतर आवडणारे संगीत, खेळ यासह इतर गोष्टींत मन रमवावे. योगा केल्यास रक्तदाबही कमी होतो. चिडचिड न करता शांतपणे पुढच्याचे म्हणणे ऐकून घेणे हा चांगला उपाय आहे.
सध्या रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. वेळेत योग्य उपचाराने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
डॉ. पायल जैस्वाल, फिटनेस तज्ज्ञ