जालना : महिलेवर बलात्कार करुन डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दुधा शिवारात गेल्या आठवाड्यात घडली. लता भानुदास चाटे (२९, रा. टाकळखोपा) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मंठा पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.मिळालेल्या माहितीनूसार विवाहिता लता चाटे मागील सहा दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या नातेवाईकांनी मंठा पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतू गुरूवारी सदर महिलेचा मृतदेह दुधा शिवारातील एका नाल्यात आढळुन आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरुन आरोपी रंजीत सवाईराम जाधव (३५, पेवा) याला अटक केली आहे. सदर महिलेवर बलात्कार करुन तिच्या डोक्यात दगड घालून तिला जिवंत ठार केल्याचे खुलाशात नमुद केले आहे.सदर महिलेच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने आरोपीने पळविले आहे. याप्रकरणी मंठा पोलीसात प्रभु विठोबा आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्कार करुन महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:25 IST