महिलेची दोन मुलासह आत्महत्या; जाफराबाद तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:51 IST2020-06-11T14:51:02+5:302020-06-11T14:51:57+5:30
शेतातील राहत्या घरालगत असलेल्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या

महिलेची दोन मुलासह आत्महत्या; जाफराबाद तालुक्यातील घटना
देळेगव्हाण : जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील २८ वर्षीय महिलेने आपल्या दीड वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
देळेगव्हाण शिवारात रखमाबाई सुधाकर बनकर हे पती- पत्नी दोन मुलासह शेतातच पत्र्याचे शेड करून राहत होते. बुधवारी रात्री सर्वजण घरात झोपले असताना रखमाबाई बनकर (२८) हिने मुलगी प्रणिती (७) व मुलगा शंभो (दीड वर्षाचा) या दोन चिमुकल्यांना घेऊन शेतातील राहत्या घरालगत असलेल्या विहिरीत उडी घेतली.
ही बाब गुरूवारी सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीचे बांधकाम झाले नसल्याने मृतदेह काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह तपासणीसाठी पाठविण्यात आले अूसन, आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.