आजारपणातील खर्चाला कंटाळून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:29+5:302020-12-23T04:27:29+5:30
लहान फोटो हसनाबाद : अर्धांगवायूचा होणारा त्रास आणि त्या आजासाठी होणारा खर्च याला कंटाळून एका ४२ वर्षीय महिलेने विहिरीत ...

आजारपणातील खर्चाला कंटाळून महिलेची आत्महत्या
लहान फोटो
हसनाबाद : अर्धांगवायूचा होणारा त्रास आणि त्या आजासाठी होणारा खर्च याला कंटाळून एका ४२ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयत महिलेचे पार्थिव मंगळवारी पिंपळगाव कोलते (ता. भोकरदन) गावाजवळील विहिरीत आढळून आले.
छाया कैलास सोळुंके (४२) असे मयत महिलेचे नाव आहे. पिंपळगाव कोलते येथील छाया कैलास साळुंके या २० डिसेंबर रोजी घरातून निघून गेल्या होत्या. त्याबाबत हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी त्यांचे पार्थिव गावाजवळील एका विहिरीत आढळून आले. छाया साळुंके यांना केवळ दीड एकर शेती असून, त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना तीन मुली असून, इंजिनिअर झालेल्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. दुसरी मुलगी डीफार्मसीला शिकत आहे, तर लहान मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यांना काही महिन्यांपूर्वी अर्धांग वायूचा त्रास होत होता. त्यात शेतातील उत्पन्नही हाती येत नव्हे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आजारपणावर होणारा खर्च याला कंटाळून छाया साळुंके यांनी गावातीलच मारोती मंदिरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पार्थिव विहिरीबाहेर काढले. हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. ए. एच. जेवरीकर यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले. मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुली, जावई असा परिवार आहे. या घटनेची हसनाबाद पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास सपोनि संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुभाष चव्हाण करीत आहेत.