शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ््यातच जालना जिल्ह्याची टँकरवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:36 IST

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असून, या वर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातच ३.४७ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. तर जिल्हाभरातील ८७ पैकी ३१ बोअरवेल नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडले आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज आहे.यावर्षी पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात वरुणराजा बरसला. परंतु, त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून केली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच सध्या भूजल पातळीत घट झाल्यामुळे जिल्हाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ३७ बोअरवेल कोरडेठाक पडले आहे. परिणामी, जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणा-या काळात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्तक राहण्याची गरज आहे.जाफराबाद, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरजालना जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात भोकरदन तालुक्यातील १८ गावांमध्ये सवार्धिक २४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जाफराबाद तालुक्यातील ११ गावांमध्ये १४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बदनापुर तालुक्यात १, अंबड तालुक्यात १ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जालना, मंठा, परतूर घनसावंगी तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नाही.भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वच विहिंरीमधील भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याचे समोर आले. यात भोकरदन तालुक्यातील भूजल पातळीत - ४.६२ मीटरने घट झाली. तर परतूर तालुक्यातील -४.३६, अंबड तालुक्यातील भूजल पातळीत -४.०९ घट झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळGovernmentसरकार