पूर्णा नदीपात्रात साचलेले पाणी तळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:25+5:302021-01-18T04:28:25+5:30
जाफराबाद : जाफराबाद परिसरात मृदसाठा म्हणून असलेले खडक पूर्णा धरणातील पूर्णा नदीचे पाणी जानेवारी महिन्यातील दुसर्याच आठवड्यात तळाला जाऊन ...

पूर्णा नदीपात्रात साचलेले पाणी तळाला
जाफराबाद : जाफराबाद परिसरात मृदसाठा म्हणून असलेले खडक पूर्णा धरणातील पूर्णा नदीचे पाणी जानेवारी महिन्यातील दुसर्याच आठवड्यात तळाला जाऊन पोहचले आहे. त्यामुळे पुढील तीन महिने आहे ते पाणी सर्वांनाच जपून वापरावे लागणार आहे. या बरोबरच ही बाब सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे.
मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्प गेल्या सहा वर्षात प्रथमच गतवर्षी तुडुंब भरला होता. सातत्याने दुष्काळाचा सामना करणाºया या भागाला या वर्षी खडकपुर्णा धरण पूर्ण भरल्याने मोठा दिलासा मिळाला होता. पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठीही सोय उपलब्ध झाली म्हणून पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक असतांना मिळणारे पाणी याचा जपून वापर न करता योग्यतेपेक्षा जास्त वापर केला गेला आहे. शिवाय प्रकल्पातील पाणी कॅनोलमधून सोडण्यात येत असल्याने पाण्याचा विसर्ग होऊन कमी झाला आहे. खडकपूर्णा धरणाची क्षमता ९३.४० दलघमीची आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ९१.६६ दलघमी म्हणजेच ९८.१४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण शंभर टक्के भरून जास्तीचे पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
खडक पूर्णा धरणात मराठवाड्यातून पाण्याची आवक आहे. असे असले तरी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेला जाफराबाद तालुक्यामधील गावे या पाण्यापासून वंचित आहेत. याचे खरे कारण राजकारण आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जोपर्यंत पूर्णा नदी पात्रात पाण्याचा मृदसाठा आहे. तो पर्यंत याचा फायदा नदी परिसरातील असलेल्या गावांना होतांना दिसत आहे. या नंतर १०० गावांपैकी ९० गावे कायम तहानलेली हे आपण दरवर्षी पाणी टंचाई आरखड्यावरून पाहत आहेत. त्यामुळे येणाºया काळात पाण्याचा अधिकचा वापर न करता काळजी घेणे आवश्यक आहे.