द्वेतभाव नष्ट झाल्यास एकत्वाची भावना निर्माण होते- व्होंडेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:15+5:302021-02-19T04:20:15+5:30
परतूर : ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते, असे मत ह.भ.प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर ...

द्वेतभाव नष्ट झाल्यास एकत्वाची भावना निर्माण होते- व्होंडेगावकर
परतूर : ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते, असे मत ह.भ.प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील रेवलगाव येथे भागवत कथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे हभप व्होंडेगावकर म्हणाले की, मनूष्य जीवन जगत असतांना, आपला आणि परका हा भाव ठेवतो. आपलेपणात द्वेत नाही, अभिमान नाही. ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते. तसेच आपल्या स्वभावाशी जुळणाºयांशीच खेळ खेळावा. जे भक्तीचा खेळ खेळण्यास घाबरतात, त्यांना खेळापासून दूर ठेवावे. देवाजवळ भ्याडपणा चालत नाही, असेही शेवटी त्यांनी सांगितले. सप्ताहात श्री १०८ स्वामी परमेश्वर यती यांनी आपल्या रसाळ वाणीतून भागवत सांगितली. यावेळी ह.भ.प. तुकाराम बिडवे, ह.भ.प. रामेश्वर नरवडे, मारोती दांगट, संजय फोके, कृष्णा व्होंडे, योगेश आकात, महादेव वैद्य, माऊली राऊत, गणेश सुरूंग यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
फोटो
परतूर तालुक्यातील रेवलगाव येथे कीर्तनात बोलताना हभप रामप्रसाद व्होंडेगावकर आदी.