बदलत्या वातावरणामुळे गहू पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:07+5:302021-02-05T08:03:07+5:30
गांधी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम जालना : शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन ...

बदलत्या वातावरणामुळे गहू पीक धोक्यात
गांधी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
जालना : शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके, डॉ.प्रमोद ढोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.एल.बी. दरगुडे यांनी तर आभार प्रा.सचिन जयस्वाल यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी घेतली रुग्णालयाची माहिती
जाफराबाद : राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्रशालेतील मुलींना क्षेत्रभेट कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयात चालणाऱ्या कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी डॉ.डी.एम. पाटील, धोंडीराम कऊटकर, मुख्याध्यापक शिवहरी ढाकणे, वैशाली राऊत, ओ.सी. देशमुख, संदीप शेळके यांची उपस्थिती होती.
सूचना फलक बसविण्याची मागणी
भोकरदन : शहराला जोडणाऱ्या महामार्गांसह ग्रामीण भागातील रस्त्यावरील सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे चालकांची गैरसोय होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन सूचना फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.