माहोरा शाळेला सर्व ती मदत करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:28+5:302021-02-26T04:43:28+5:30
माहोरा : शासन आदेशानुसार शाळांना मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या धर्तीवर माहोरा शाळेची निवड करण्यात आली असून, ...

माहोरा शाळेला सर्व ती मदत करू
माहोरा : शासन आदेशानुसार शाळांना मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या धर्तीवर माहोरा शाळेची निवड करण्यात आली असून, शाळेला जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याची ग्वाही, अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी दिली.
माहोरा येथील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, शिक्षण सभापती पूजा सपाटे, शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची भेट घेतली. माहोरा शाळेला आवश्यक असलेले साहित्य व इतर सुविधा पुरविणार असल्याचे सभापती पूजा सपाटे यांनी सांगितले. तर प्रशासकीय पातळीवरील सर्व ती मदत करण्याची ग्वाही शिक्षणाधिकारी दातखिळ यांनी दिली. यावेळी माहोरा जिल्हा परिषद हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वरपे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हले, मुख्याद्यापक श्रीकृष्ण चेके, आदर्श शिक्षक गणेश पवार, रामेश्वर खलसे, आर. एस. जाधव, अरगडे आदींची उपस्थिती होती.
फोटो