शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील चरच ठरतेय पाण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:51 IST

भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते.

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता वाढली : पद्मावती धरणाची पाणी पातळी खालावल्याने खोदली चर

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते. मात्र, आता दुष्काळाची दाहकता वाढली असल्याने तसेच या धरणावर पाण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून टँकरचा ओढा असल्याने या धरणातील पाणी पातळी आता जोत्याखाली आली असल्याने या धरणात आता परिसरातील ग्रामपचांयतीने चर खोंदुन पाण्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.दरम्यान प्रशासकीय बैठकीत चर खोदुन पाण्याची व्यवस्था करावी अशा देखील सुचना यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तालुका प्रशासन देखील आता पाण्याच्या शोधात भर उन्हात धावपळ करु लागले आहे. तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरातील नदी, नाले, तलाव, लघु, मध्यम प्रकल्प यांनी हिवाळ््याच्या प्रारंभीच तळ गाठला होता. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली असून ८९ गावांमध्ये १०५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दानापूर येथील जुई धरण तसेच शेलुद येथील धामणा धरण हे कधीचेच आटले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची भिस्त ही बाणेगाव व पद्मावती धरणावर येऊन ठेपली आहे. मात्र, त्यात देखील आता झपाट्याने पाणी उपसा सुरु असल्याने हे दोन्ही धरणातील पाणी पातळी देखील धोक्यात आली आहे.येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्यासाठी अडचण भासू नये म्हणून तालुका प्रशासन देखील भर उन्हात टंचाईग्रस्त भागात भेट देऊन पाणी टंचाईचा आढावा घेऊन त्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.सध्या पद्मावती, जुई धरण व बाणेगाव येथील धरणात प्रशासनाने मोठाले सहा चर खोदण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.या व्यतिरिक्त अठरा ग्रामपचांयतीने लोकसहभाग व चौदाव्यावित्त आयोगातुन चर खोदुन आपली पाण्याची व्यवस्था करुन घेतली आहे. मात्र, चराचे पाणी हे दिर्घ कालीन टिकणारे नसल्याने आणखी काही दिवसात अडचणी निर्माण होऊ शकत असल्याचे ग्रामपचांयतीने सांगितले आहे.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणwater shortageपाणीटंचाई