शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसाआड होणार शहरवासीयांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:45 IST

लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाच्या कामात फुटलेली पाईपलाईन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अडथळा निर्माण झाली होती. या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतीम टप्प्यात असून, लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सरासरीच्या अपेक्षित पाऊस झालेला नव्हता. जुना जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात अपुरा पाणीपुरवठा होता. तर नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प कोरडाठाक पडला होता. त्यामुळे शहरातील पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम झाला होता. जायकवाडी प्रकल्पातून मिळणाºया पाण्यावर पालिकेने पाणीवितरणाचे नियोजन केले होते. मात्र, अनेक भागात दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आणि जायकवाडी प्रकल्पासह घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे आता जुना जालना व नवीन जालना भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.नवीन जालना भागाला घाणेवाडी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, समृध्दी महामार्गाच्या कामात या पाणीपुरवठा योजनेवरील पाईप फुटले होते. घाणेवाडी प्रकल्प भरल्याने नवीन जालना भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे कामही पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम चार ते पाच दिवसात पूर्ण होण्याची आशा पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर जुना जालनासह नवीन जालना भागात चार दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीcivic issueनागरी समस्या