रबी हंगामासाठी निम्न दुधनाच्या कालाव्यातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:21+5:302021-02-19T04:20:21+5:30

परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तिसºयांदा पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा परभणी, जिंतूर, ...

Water released from low milking period for rabi season | रबी हंगामासाठी निम्न दुधनाच्या कालाव्यातून सोडले पाणी

रबी हंगामासाठी निम्न दुधनाच्या कालाव्यातून सोडले पाणी

परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तिसºयांदा पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा परभणी, जिंतूर, सेलू व मानवत येथील शेतकºयांच्या पिकांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे.

यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले खळखळून वाहिले. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी छोटे-मोठे तलाव तुडुंब भरले आहेत. जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला निम्न दुधना प्रकल्प यंदा प्रथमच १०० टक्के भरला. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त करत रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उस लागवडीबरोबरच बागायती क्षेत्रात वाढ झाली. पिकांना पाणीची गरज असल्याने शेतकºयांनी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन अधिकाºयांनी पाणी सोडले होते. त्यानंतर दुसऱ््यांदा पाणी सोडण्यात आले होते. आता तिसºयांदा धरणातून पाणी सोडण्यात आले असून, याचा फायदा परभणी, जिंतूर, मानवत व सेलू तालुक्यातील शेतकºयांनी होणार आहे. डाव्या कालव्यातून ९०.०० क्यूसेक तर उजव्या कालव्यातून ४०.०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवर्षी रब्बी पिकासाठी तीनवेळा, तर उन्हाळी पिकांसाठी तीन असे एकूण सहा पाणी सोडण्यात येते.

चौकट

धरणात ८१.९७ टक्के जीवंत पाणीसाठा

रब्बी पिकांसाठी तिसºयांदा पाणी सोडण्यात आले आहे. सद्यास्थितीत धरणात २४२.२०० दलघमी जीवंत पाणी साठा आहे. म्हणजेच ८१.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे पिकांसह पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Water released from low milking period for rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.