वालसावंगी केंद्राला मिळाले दोन डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:51+5:302021-09-17T04:35:51+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील एक वैद्यकीय ...

वालसावंगी केंद्राला मिळाले दोन डॉक्टर
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील एक वैद्यकीय अधिकारी रुजू झाले असून, दुसरेही लवकरच रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय या केंद्राला दोन नवीन रूग्णवाहिकाही मंजूर करण्यात आल्या आहेत.
वालसावंगी व परिसरातील असंख्य गावातील नागरिकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्याची सेवा दिली जाते. परंतु, रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे आणि रूग्णवाहिकेचा अभाव यामुळे येथील रूग्णांसह नागरिकांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता या केंद्राला नवीन दोन वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. त्यातील डॉ. अहेमद हे रुजू झाले आहेत. तर डॉ. सय्यद साेहेल हे ही लवकरच रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच या आरोग्य केंद्रास दोन नवीन रूग्णवाहिकाही मंजूर झाल्या आहेत. त्या रूग्णवाहिका लवकरच रूग्णालयाच्या ताफ्यात येणार आहेत. त्यामुळे येथील रूग्णांसह नातेवाईकांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत होणार आहे.