शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या गोदामाची भिंत कोसळून दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:42 IST

जुना मोंढा परिसरातील सूरजचंद जांगडा आणि उत्तमचंद धोका यांच्या दुकानांना लागून असलेल्या जुन्या गोदामाची भिंत गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अचानक कोसळल्याने तेथे काम करत असलेले दोन मजूर जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जुना मोंढा परिसरातील सूरजचंद जांगडा आणि उत्तमचंद धोका यांच्या दुकानांना लागून असलेल्या जुन्या गोदामाची भिंत गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अचानक कोसळल्याने तेथे काम करत असलेले दोन मजूर जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल तसेच जेसीबीच्या मदतीने मृतदेह तसेच जखमींना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. या दुर्घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.मोंढा परिसरात धोका यांच्या दुकानाच्या मागील बाजूस बांधकाम सुरू होते. त्याचवेळी जवळ असलेल्या जीर्ण गोदामाची भिंत सकाळी अचानक कोसळली. यात ढिगाºयाखाली दबले गेल्याने प्रकाश लक्ष्मणराव खंदारे (रा. गोंदेगाव, ४७) आणि काकासाहेब देवराव कबाडे (५३ रा. राळाहिवरा) हे दोघे जागीच ठार झाले. तर सुधाकर नामदेव लहाने शिवाजी चोखाजी लहाने आणि बद्रीनाथ वाकोडे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सदर बाजार पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात आली असून, बांधकाम करताना योग्य ती खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस म्हणाले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मुख्याधिकारी खांडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातून जाणारे दीपक भुरेवाल, संजय भगत तसेच मेघराज चौधरी यांनी कुठलीही पर्वा न करता ढिगाºयाखाली दबलेल्या जखमींनी काढण्यासाठी मदत केली. त्यांनी तातडीने जेसीबी मागवून ढिगारा बाजूला केला. तसेच रूग्णवाहिकांना कळवून जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मदतीला परिसरातील अनेकांनी हातभार लावला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राऊत यांनी भेट दिली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू