जालना येथील प्रतीक्षा नवगीरे ‘मिस इंडिया’ स्पर्धेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:42 IST2018-11-16T00:41:07+5:302018-11-16T00:42:10+5:30

म्हणतात ना.. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात.. या म्हणीचा प्रत्यय जालन्यातील प्रतीक्षा प्रशांत नवगीरे या युवतीच्या रूपाने पुढे आला आहे.

Waiting for 'Miss India' contest in Jalna | जालना येथील प्रतीक्षा नवगीरे ‘मिस इंडिया’ स्पर्धेस पात्र

जालना येथील प्रतीक्षा नवगीरे ‘मिस इंडिया’ स्पर्धेस पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : म्हणतात ना.. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात.. या म्हणीचा प्रत्यय जालन्यातील प्रतीक्षा प्रशांत नवगीरे या युवतीच्या रूपाने पुढे आला आहे. संगीत, क्रीडासह अभ्यासातही लहानपणापसूनच चुणूक असलेल्या प्रतीक्षेला मिस इंडिया तसेच त्याही पुढील स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होती.
या तिच्या ध्येयाची पहिली पायरी ती यशस्वीपणे चढली असून, पुढील वर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या मिस इंडिया स्पर्धेसाठीची पात्रता फेरी तिने यशस्वीपणे पार केल्याने जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अत्यंत महत्वाच्या अशा स्पर्धेसाठी जालन्यातील प्रतीक्षा नवगीरेची निवड झाल्याबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे. ती सध्या बीएसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, यापूर्वी तिने बेसबॉल, तलवारबाजी यात राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. तिला खेळाच्या क्षेत्राचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले आहे. एकूणच गुरूवारी औरंगाबादेत झालेल्या पात्रता फेरीत तिची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रतीक्षाचे वडिल प्रशांत नवगीरे यांनी दिली. यापूर्वी जालना तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत यश मिळविले होते.
प्रसिध्द अभिनेत्री पियंका चोप्रा आणि मानसी चिन्नार या आपल्या आदर्श असल्याचे प्रतीक्षाने सांगितले. मॉडेलिंग करतानाच या स्पर्धेची तयारी केल्याचे तिने सांगितले.

Web Title: Waiting for 'Miss India' contest in Jalna