कोविडचे मृत्यू वाढल्याने स्मशानभूमीतही वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:01+5:302021-03-23T04:32:01+5:30
कोविड रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यास त्याचा मेसेज हा मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना जातो. नंतर ते ...

कोविडचे मृत्यू वाढल्याने स्मशानभूमीतही वेटिंग
कोविड रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यास त्याचा मेसेज हा मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना जातो. नंतर ते लगेचच त्याची दखल घेऊन अंत्यसंस्कारासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांसाठी गांधीनगर परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी आहे. तेथेच गेल्या वर्षभरापासून अंत्यसंस्कार केले जातात. यासाठी पालिकेचे कर्मचारी अरुण वानखेडे, श्रावण सराटे, शोएब खान, राजू गवळी, यासह पाच ते सात मजूर मदत करतात. ज्याच्या धर्मात दफनविधी असेल, त्यांच्यावर तसेच अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालूनच केले जातात.
चौकट
जालना पालिकेकडून कोरोनामुळे मृ्त्यू झालेल्यांसाठी लागणारी लाकडे आणि गोवऱ्या मोफत दिल्या जातात. त्यामुळे तो खर्च वाचतो. अनेक गोरगरिबांना याचा मोठा लाभ झाला आहे. त्यासाठी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी पुढाकार घेतल्याचे अरुण वानखेडे यांनी सांगितले.