वडीगोद्री ते दुनगाव रस्त्याची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:14+5:302021-01-08T05:41:14+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री-रामगव्हाण-टाका-दुनगाव या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या ...

वडीगोद्री ते दुनगाव रस्त्याची लागली वाट
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री-रामगव्हाण-टाका-दुनगाव या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील वडीगोद्री-रामगव्हाण-टाका-दुनगाव या रस्त्यावर अनेक गावे आहेत. अंतर कमी असल्याने बहुतांश जण या रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र, अलीकडे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली आहे. काटेरी झुडपांचा फटकारा बसून, गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावरील खडी उखडून गेली आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वडीगोद्री ते दुनगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. ही काटेरी झुडपे ये-जा करणाऱ्या वाहनांना लागत आहे. रस्ता दुरूस्त करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
समीर शेख, ग्रामस्थ, रामगव्हाण
वडीगोद्री-रामगव्हाण-टाका-दुनगाव या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहे. या रस्त्याचे तातडीने काम करावे.
अंबादास गायकवाड, ग्रामस्थ, टाका
-----------