मतदारांचा कौल युवा शक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:42+5:302021-01-19T04:32:42+5:30
भाटेपुरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य यादवराव राऊत यांना आपला गड राखता आला नाही. तर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष वसंतराजे ...

मतदारांचा कौल युवा शक्तीकडे
भाटेपुरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य यादवराव राऊत यांना आपला गड राखता आला नाही. तर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष वसंतराजे जाधव यांनाही मतदारांनी दुसऱ्यांदा संधी दिली नाही. कडवंची येथील मतदारांना युवाशक्तीला प्राधान्य दिले. काही ठिकाणी मात्र विकासाची धुरा चांगली सांभाळणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी कायम ठेवले. काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष वसंतराजे जाधव यांनी सांगितले की आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना मतदारसंघांमध्ये काँग्रेसला चांगला विजय मिळाला. १९ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहिते यांनी सांगितले की मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ४५ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार जालना तालुक्यातील आणि घनसावंगी मतदार संघात असणाऱ्या ३४ ग्रामपंचायतींपैकी पैकी २२ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहे. तर भाजपा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब कोलते यांनी सांगितले की, २२ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा विजय झाला झाल्याचे दिसून येत आहे.