विवेकानंद, जिजाऊंची जयंती जिल्हाभरात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:44+5:302021-01-14T04:25:44+5:30

जालना : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी महापुरुषांच्या कार्याविषयी ...

Vivekananda, Jijau's birthday celebrated all over the district | विवेकानंद, जिजाऊंची जयंती जिल्हाभरात साजरी

विवेकानंद, जिजाऊंची जयंती जिल्हाभरात साजरी

जालना : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी महापुरुषांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली, तर सामाजिक संस्थांसह शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले.

राजूर उत्सव समिती

राजूर : उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. सर्वप्रथम सकाळी मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वेशभूषा, गीतगायन, भाषण आदी कला सादर केल्या. यात गुणानुक्रमे आलेल्या स्वप्निल पुंगळे, भक्ती फुके, अथर्व मालुसरे, अनुष्का अक्कर, प्रांजल पुंगळे, भार्गवी पांडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेत व्यंकटेश वाघ, महादेवी वायाळ, प्रांजल बोराडे, शिवकन्या रजाळे, अमय जायभाय, प्रणव दरक, कुणाल कुबेर, रोहन पगारे, संजीवनी रजाळे, चैताली खरात, खुशी हिंगमीरे, दीपक जाधव, विराज गिरी, वेदांत जटाळे, कार्तिकी निकम, आरोही जायभाये, कल्याणी मालुसरे, श्रद्धा सांगळे, भक्ती तायडे आदींनी सहभाग घेतला होता.

---------

गणपतदादा इंग्लिश स्कूल

राजूर : गणपत दादा इंग्लिश स्कूलच्या वतीने येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात कंत्राटदार सुधाकरराव दानवे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माँ जिजाऊंच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य सांडू पुंगळे, ज्ञानेश्वर पुंगळे, पंढरीनाथ करपे, रामेश्वर गव्हाड, विकास मीसाळ, प्राचार्या आशाताई पुंगळे, कुलदीप गिरी, विष्णू पुंगळे, उमेश पुंगळे, विनोद पुंगळे, प्रा. बाळासाहेब बोराडे, भगवान नागवे, विजय ठोंबरे, कैलास बावस्कर, कुलदीप गिरी यांची उपस्थिती होती.

-----------

फोटो आहे

वंचित बहुजन आघाडी, जालना

जालना : वंचित बहुजन आघाडी (जालना) शहराच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, जिल्हा प्रवक्ते कैलास रत्नपारखे, जिल्हा सचिव नंदकिशोर माने, अमोल लोखंडे, शहर सचिव अनिल झोटे, शहर सचिव किशोर जाधव, आत्माराम यादव, अर्जुन जाधव, माणिक मगर आदींची उपस्थिती होती.

-----------

फोटो आहे

घनसावंगी कार्यक्रम

घनसावंगी : शहरातील आयोजित कार्यक्रमाला नितीन फलके, डिगंबर धुमाळ, सतीश ढेरे, ज्ञानेश्वर उढाण, प्रकाश भोसले, दिलीप वाडेकर, नाना देवडे, पांडुरंग कथले, सुरेश घोगरे, अशोक घुमरे आदींची उपस्थिती होती.

-----------

फोटो आहे

मत्स्योदरी विद्यालय, अंबड

अंबड : शहरातील मत्स्योदरी विद्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग घोगरे, उपमुख्याध्यापक देविदास माने, पर्यवेक्षक रमेश पवार, तांबडे, जवळकर, धनंजय गुळवणे यांची उपस्थिती होती.

-----------

फोटो आहे

तीर्थपुरी येथे कार्यक्रम

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शैलेंद्र पवार, शिवाजी बोबडे, श्रीकृष्ण बोबडे, अंकुश बोबडे, तुषार पवार, सचिन चिमणे, सतीश पवार, प्रशांत बोबडे, शंकर बोबडे, सोमनाथ वरकड, पांडुरंग चिमणे, संतोष बोबडे, राजेंद्र चिमणे, राजू राजे, जनार्धन बारवकर, सुदाम मापारे आदींची उपस्थिती होती.

------------

फोटो आहे

प्रहार संघटना, जालना

जालना : प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी घंघटनेच्या वतीने कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला आर.एम. फटाले, गिरीधर राजपूत, सुरेश धानुरे, मुकेश गाडेकर, विलास वाघमारे आदींची उपस्थिती होती.

----------

जिल्हा परिषद शाळा, गुंडेवाडी

जालना : गुंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र कार्लेकर, नीता बागडी, सुनील साबळे आदींची उपस्थिती होती.

---------

मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन

भोकरदन : शहरातील मोरेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रा.गोवर्धन मुळक व प्रभाकर मिरकर यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी प्राचार्य भगवान डोंगरे यांनी मार्गदर्शन केले, शिवाय जिजाऊंचा आदर्श आजच्या मुलींनी घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रा.डॉ. दिनकर कळंबे, डॉ.रघुनाथ सपकाळ, विद्यासागर सोनकांबळे, दिनेश हंगे, प्रा.परमेश्वर मिसाळ, डॉ.गजानन खरात, सजन कचरे, प्रकाश आहेर, सुनील फुके, वसंत ठोंबरे, श्याम भांदर्गे, संतोष कोल्हे आदींची उपस्थिती होती. विजय मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.परमेश्वर मिसाळ यांनी आभार मानले.

-----------

फोटो आहे

राजर्षी शाहू विद्यालय, पारध

पारध : येथील राजर्षी शाहू विद्यालय व महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजाराम डोईफोडे होते. प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आर्या अल्हाट ही राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत होती. मुख्याध्यापक विलास लोखंडे व प्राध्यापक मंगेश लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य अमोल बांडगे, सुधाकर शिरसाठ, अनिल लक्कस, राजेंद्र जाधव, नीलेश लोखंडे, विवेक अवसरमोल, भागवत पानपाटील, गजानन लोखंडे, संजय तबडे यांची उपस्थिती होती. शुभांगी दांडगे हिने सूत्रसंचालन केले. जानवी पाटील यांनी आभार मानले.

-------------

फोटो आहे

जिल्हा परिषद शाळा, बरंजळा (लो)

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पी.डी. सोळुंके यांनी प्रतिमा पूजन करून महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी आशिष भोवते, समाधान महाराज लोखंडे, भास्कर राऊत, इंगळे, सहाणे आदींची उपस्थिती होती.

----------

फोटो आहे

मंगरूळ येथे कार्यक्रम

देळेगव्हाण : मंगरूळ येथे कविता शिवणकर यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जाफराबाद युवक तालुका अध्यक्ष नितीन शिवणकर, प्रभावती शिंदे, अनिता बोर्डे, अलका डोके, अलका शिंदे, आश्विनी डोके, मीनाताई गवते आदींची उपस्थिती होती.

Web Title: Vivekananda, Jijau's birthday celebrated all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.