विश्वजित खरात यांची भाजपच्या घनसावंगी विधानसभा प्रमुखपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:23+5:302021-07-13T04:07:23+5:30
घनसावंगी येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे, माजी आमदार ...

विश्वजित खरात यांची भाजपच्या घनसावंगी विधानसभा प्रमुखपदी निवड
घनसावंगी येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे, माजी आमदार अॅड. विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या आग्रही भूमिकेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विश्वजित खरात यांच्या निवडीला मान्यता दिली. पक्षसंघटनेच्या आढावा बैठकीनंतर सिद्धीविनायक मुळे यांनी घनसावंगी भाजप विधानसभा प्रमुखपदी विश्वजित खरात यांची निवड झाल्याचे घोषित केले. भाऊराव देशमुख यांनी खरात यांचा सत्कार केला. यावेळी भाऊराव देशमुख, सिद्धीविनायक मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, देवनाथ जाधव, अशोक जाधव, विष्णुपंत जाधव, शिवाजी पवार, प्रल्हाद सोळंके, व्यकंट आर्दड, माजीद काजी, शिवाजी जाधव, लक्ष्मण काटे, संतोष पवार, अॅड. वैभव कटके, नाना खरात, प्रेमराज उढाण, परमेश्वर सोनवणे, शेषनारायण मापारी, सुनील वरखडे, अशोक मुळे, प्रताप कंटुले, राजाभाऊ तौर, भरत परदेशी, पांडुरंग साळवे, रामेश्वर गरड, प्रभाकर देशमुख, बंडुराव आराध्य, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर डोईफोडे, नवनाथ बुलबुले, अर्जुन भोसले आदींची उपस्थिती होती.
फोटो