शासकीय अधिका-यांकडून वाहनांवरील दिव्यांच्या नियमांचे उल्लंघन

By Admin | Updated: July 19, 2016 02:18 IST2016-07-19T02:18:45+5:302016-07-19T02:18:45+5:30

परतूरचे तहसीलदाराकडून वाहनांवरील दिव्यांच्या नियमांचे उल्लंघन, सुट्टीच्या दिवशी वापर.

Violation of vehicle law rules by government officials | शासकीय अधिका-यांकडून वाहनांवरील दिव्यांच्या नियमांचे उल्लंघन

शासकीय अधिका-यांकडून वाहनांवरील दिव्यांच्या नियमांचे उल्लंघन

दादाराव गायकवाड / शिखरचंद बागरेचा / वाशिम
सनदी अधिकार्‍यांना आपल्या शासकीय वाहनावर फ्लॅशर असलेला अंबर दिवा लावण्याची परवानगी नसतानाही जालना जिल्ह्यातील परतूर येथील तहसीलदारांनी चक्क त्यांच्या गाडीवर फ्लॅशर असलेला अंबर दिवा लावल्याचे आणि त्याचा खासगी कामासाठी वापर केल्याचे ह्यलोकमतह्णकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रविवारी रात्री १0.३0 वाजता वाशिम येथे उघडकीस आले.
प्रशासकीय अधिकार्‍यांना आपल्या वाहनांवर अंबर दिवे लावण्याची मनाई आहे. यासंदर्भात राज्य शासनाने परिपत्रक काढून अधिकार्‍यांना वाहनावर कोणते दिवे लावायचे, त्यासंदर्भातील नियम निश्‍चित केले. या परिपत्रकात राज्यातील मंत्री, विविध विभागाचे सचिव, उपसचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी आपल्या वाहनांवर कोणते दिवे लावायचे, त्याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. या परिपत्रकात तहसीलदारांना आपल्या गाडीवर फ्लॅशर असलेला अंबर दिवा लावण्याची परवानगी असल्याचे कोठेही नमूद नाही. तथापि, त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याचे दिसत आहे. वाशिम शहरात १७ जुलै रोजी रात्री १0.३0 वाजता शहरातील रस्त्यावरुन फ्लॅशर असलेला अंबर दिवा चालू अवस्थेत असलेली स्कॉर्पिओ कंपनीची एमएच-२१, एएक्स-0७१२ गाडी रस्त्याने जाताना दिसली. या वाहनाचा पाठलाग ह्यलोकमतह्ण चमूने केला. यावेळी ही गाडी पुसद नाका परिसरात येऊन उभी राहिली. गाडीवर फ्लॅशर असलेला अंबर दिवा असल्यामुळे सदर गाडी कोण्या अधिकारी, पदाधिकार्‍याची आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाल्याने ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधींनी सहज म्हणून चौकशी केली. त्यावेळी समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे शंका आल्याने यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, सदर गाडी जालना जिल्ह्यातील परतूर येथील विनोद गुंडमवार या तहसीलदारांची असल्याचे कळले. उल्लेखनीय बाब अशी की, या गाडीत कोणतेही शासकीय अधिकारी, नव्हे तर सदर तहसीलदारांचे कुटुंब असल्याचे समजले. त्यामुळे त्याची खातरजमाही करून घेण्यात आली. या प्रकारावरून सदर तहसीलदार नियमाचे उल्लंघन करून वाहनावर फ्लॅशरसह अंबर दिवा लावून वाहनाचा खासगी वापर करीत असल्याचे दिसले. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर तहसीलदार जालना जिल्ह्यातील परतूर येथे कार्यरत असल्याचे आणि ते वापरत असलेली अंबर दिव्याची गाडी ही जालना येथील प्रकाश चव्हाण या व्यक्तीच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Violation of vehicle law rules by government officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.