विजय उमेदवारांचे ग्रामस्थांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:00+5:302021-01-19T04:33:00+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील १९ ग्रामपंचायतीच्या निकालात आघाडीच्या तरुण उमेदवारांना मतदाराजाने कौल दिला आहे. अकोली येथे निवडून ...

विजय उमेदवारांचे ग्रामस्थांकडून स्वागत
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील १९ ग्रामपंचायतीच्या निकालात आघाडीच्या तरुण उमेदवारांना मतदाराजाने कौल दिला आहे. अकोली येथे निवडून आलेल्या उमेदवारांचा ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. लिंगसा, पांडेपोखरी, पिंपळी धामणगाव, संकनपुरी, कोकाटे हादगाव येथे आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले.
बाणाचीवाडी, आसनगाव, परतवाडी, अकोली, लिखीत पिंपरी, ब्राह्मणवाडी, सावरगाव, सेलगाव या ठिकाणी भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे, तर कार्हाळा, सुरुमगाव, वाहेगाव, सातारा, गंगासावंगी, हनवडी या ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांची सरशी झाली आहे. बाणाचीवाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या उमेदवारांना नाकारून नऊपैकी नऊ जागेवर नवीन उमेदवारांना संधी दिली. अकोलीत रामराव खुळे एका मताने निवडून आले. गंगासावंगी येथील बाळू टेकाळे व अण्णासाहेब टेकाळे यांना समान (१८३) मते पडल्याने टॉस करावा लागला. त्यामध्ये अण्णासाहेब टेकाळे हे विजयी झाले.