ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव विस्कटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST2020-12-30T04:40:21+5:302020-12-30T04:40:21+5:30

सोमवारी रात्री ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे खोमणे गल्लीत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला असल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रशांत खोमणे यांच्या ...

The vigilance of the villagers thwarted the thieves | ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव विस्कटला

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव विस्कटला

सोमवारी रात्री ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे खोमणे गल्लीत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला असल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रशांत खोमणे यांच्या घरावरती मागच्या बाजूने कोणीतरी चढल्याचे समजताच त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून उठविले. नागरिकांनी घराच्या अवती भाेवती फिरून पाहिले. परंतु, तोपर्यंत चोरांनी पोबारा केला होता. काही वेळाने सर्वजण झोपण्यासाठी गेले. दरम्यान पेट्रोलिंगला असणाऱ्या ग्रामसुरक्षा दलातील पोलीस मित्रांना अनोखी दुचाकीस्वार दिसले. पोलीस मित्रांनी त्यांचा पाठलाग दुचाकीवरून केला. परंतु, याचा उपयोग झाला नाही. यानंतर काही वेळाने अशोक पालकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गणपती मंदिराच्या जवळ अज्ञात व्यक्तीने झाडावरून उडी मारल्याचा आवाज आला. पालकर यांनी शेजाऱ्यांसह पोलीस मित्रांच्या मदतीने परिसरात पाहणी करून घटनेची माहिती गोंदी पोलीस ठाण्याला दिली. यानंतर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शिवाय ग्रामस्थांना धीर देऊन पोलीस मित्रांचे कौतुक केले.

Web Title: The vigilance of the villagers thwarted the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.