शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी सहाजणांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 19:40 IST

गुराख्यांनी प्रेमी युगुलाला मारहाण करून तरुणीचा केला विनयभंग

ठळक मुद्देमुलीचा विनयभंग करत केली मारहाण  घटनेनंतर व्हिडिओ व्हायरल 

जालना : तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील वनक्षेत्रात २९ जानेवारी रोजी दुपारी आलेल्या प्रेमीयुगुलाला गुराख्यांनी मारहाण केली. संबंधितांनी मारहाणीचा केलेला व्हिडिओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच तीन ते साडेतीन तासात पोलिसांनी चार आरोपींसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तरुणीचा विनयभंग करून प्रेमी युगलास टवाळखोरांची मारहाण; व्हायरल व्हिडीओने सर्वत्र संताप

बुलडाणा जिल्ह्यातील एका तरुणासह एक तरुणी २९ जानेवारी रोजी दुपारी गोंदेगाव (ता.जालना) शिवारात आले होते. गोंदेगाव शिवारातील वनक्षेत्रात ते बसले असता जनावरे चारणाऱ्या गुराख्यासह सहा ते सात मुलांनी त्या दोघांना हटकले. ते इथे कसे काय आले ? तुझ्या वडिलांचा मोबाईल नंबर दे असे म्हणत त्या युवकांनी मुलासह मुलीला मारहाण करण्यास सुरूवात केली. मुलाने आपल्या भावाला फोन लावून दिला. तरीही  ती मुलं त्या दोघांना मारहाण करीत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

गुराख्यांनी व मुलांनी प्रेमी युगुलाला मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोनि यशवंत जाधव, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोनि सुरेशकुमार गंदम, सपोनि रामोड, जोगदंड, पोउपनि मोरे, पोकॉ गायके आदींनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत गोंदेगाव गावच्या शिवारातून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

केला टिकटॉक व्हिडिओगुराख्यांनी मुलासह मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ केला. सोबत फोटो काढले आणि त्या फोटोचा वापर करून त्याद्वारे टिकटॉक व्हिडिओ तयार केला. हा टिकटॉक व्हिडिओ आणि मारहाणीचा व्हिडिओ गोंदेगाव शिवारातील अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाला आहे.

तर पोलीस देणार तक्रारसंबंधित मुला, मुलीच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला आहे. या प्रकरणात पीडित मुलीने, मुलाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार द्यावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडून तक्रार आली नाही तर या प्रकरणात सरकार पक्षाकडून पोलीस तक्रार देणार असल्याचे सांगण्यात आले.

तपास सुरू आहेगोंदेगाव येथील प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील बहुतांश आरोपी संशयित आहेत. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, लवकरच इतर आरोपीही ताब्यात घेतले जातील.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाArrestअटकPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण