जिल्हाध्यक्षपदासाठी दिग्गज स्पर्धेत
By Admin | Updated: April 24, 2015 00:36 IST2015-04-24T00:22:34+5:302015-04-24T00:36:07+5:30
जाफराबाद : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या हालचालींना वेग आला असून केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या पदास आणखी महत्व प्राप्त होत आहे

जिल्हाध्यक्षपदासाठी दिग्गज स्पर्धेत
जाफराबाद : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या हालचालींना वेग आला असून केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या पदास आणखी महत्व प्राप्त होत आहे. पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष पद बबनराव लोणीकर यांच्याकडे असल्याने अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरु करण्यात येऊन यामध्ये जिल्हा परिेदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती शेषराव पा. कळंबे यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. शिवाय माजी आ. अरविंद चव्हाण, विलासराव खरात, रामेश्वर भांदरगे, विलास नाईक, बद्री पठाडे, दिलीप तौर यांची सुध्दा नावे स्पर्धेत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठी अद्याप जाफराबाद तालुक्याला संधी मिळाली नसून, राजकारणात शेषराव पा. कळंबे हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेपासून जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, पक्ष संघटनात्मक विविध पातळीवर काम केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शेषराव पा. कळंबे यांना देण्यात यावी, अशी मागणी सुध्दा जाफराबाद तालुक्यातून पुढे येत आहे.
जिल्हाध्यक्षपदाच्या इच्छुकांमध्ये तशी दिग्गज दिसून येते. यात माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण हे देखील सर्वच क्षेत्रात अनुभवी असून बद्री पठाडे, रामेश्वर भांदरगे, विलास नाईक, दिलीप तौर यांनी अनेक वर्षापासून पक्ष संघटनेचे काम सुरुच ठेऊन चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून पक्ष संघटन वाढविणे हे यांच्यासाठी नवीन नाही.
मात्र सत्तेतील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून सर्वांची कामे, शासनाच्या विविध योजना याचा लाभ मिळवून देऊन कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याची खरी जबाबदारी आहे.
महाराष्ट्राचे नेते प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पा. दानवे यांच्या स्व जिल्ह्यातील हा प्रश्न असल्याने त्यांना ह्या पदासाठी कोण योग्य उमेदवार आहे. हे कोणी सांगण्याची गरज नाही. प्रश्न आहे तो फक्त एकनिष्ठेचा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा आहे.
त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम वाढवून समतोल कोण राखेल याचा विचार करुन या पदाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीमध्ये याविषयी सर्व पातळीवर चर्चा होऊन जाफराबाद तालुक्याला संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.