खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात अत्यल्प वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST2021-08-21T04:34:47+5:302021-08-21T04:34:47+5:30
जालना : कोरोना संसर्ग घटला आहे. त्यातच राखी पैर्णिमा असल्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात अत्यल्प वाढ
जालना : कोरोना संसर्ग घटला आहे. त्यातच राखी पैर्णिमा असल्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इंधनाचे वाढलेले दर व राखी पैर्णिमेनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात अत्यल्प वाढ झाली आहे.
दरवर्षी सणांच्या काळात मोठ्या शहरातील खासगी प्रवासभाडे वाढविले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातल्याने प्रवाशांची संख्या घटली होती. यंदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे; परंतु इंधनाचे दर वाढल्याने सर्वच नागरिक हैराण आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनीही भाडेवाढ केली आहे.
टॅव्हल्सची संख्या दुप्पट
कोरोना असल्यामुळे ट्रॅव्हल्स आता पूर्वपदावर येत आहेत. असे असले तरी पूर्ण क्षमतेने या बस महामार्गावर धावत नसल्याचे सांगण्यात आले. ६० टक्के बस या धावत असून, ४० टक्के बस या जागेवरच उभ्या आहेत.
मागील वर्षी डिझेलचा दर हा ६५ रुपये लिटर इतका होता. आजच्या स्थितीत डिझेलचा दर ९६ ते ९७ रुपयांपर्यंत गेला आहे.
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
मागील काही महिन्यांपासून डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवास खर्च वाढला आहे. त्यामुळे अत्यल्प भाडेवाढ करण्यात आली आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली तरी प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
- गणेश घुगे, टॅव्हल्स चालक