वरखेडा शाळेत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:13+5:302021-02-05T08:06:13+5:30
गांधी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार जालना : शहरातील इंदिरा गांधी विद्यालयात डॉ. सुनंदा तिडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मतदार ...

वरखेडा शाळेत कार्यक्रम
गांधी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
जालना : शहरातील इंदिरा गांधी विद्यालयात डॉ. सुनंदा तिडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मतदार जागृती अभियान घोषवाक्य स्पर्धेतील विजेता प्रदीप वाघ व माजी विद्यार्थिनी प्रा. डॉ. स्नेहल वायकोस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भास्कर शिंदे, भीमराव वाघ, प्रा. डॉ. सोमीनाथ वाघ, प्रा. विठ्ठल गाडेकर आदींची उपस्थिती होती.
२०० विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप
जालना : तालुक्यातील जळगाव सोमनाथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २०० विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मास्क, सॅनिटायझरसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. हितेश मंत्री, मधुलिका मंत्री यांच्या वतीने हे साहित्य देण्यात आले. यावेळी डॉ. हितेश मंत्री यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुजाता भालेराव, सदाशिव भुतेकर, अशोक भुतेकर, मुख्याध्यापक नामदेव गायकवाड, वाहुळ, आरती जोशी, सुदर्शन भुतेकर, अश्विनी जोशी, सोनाली राठोड यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.