अंबड शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:11+5:302021-02-05T08:05:11+5:30

अंबड : शहरासह तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गुणवंतांच्या सत्कारासह इतर ...

Various programs in the taluka including Ambad city | अंबड शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम

अंबड शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम

अंबड : शहरासह तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गुणवंतांच्या सत्कारासह इतर कार्यक्रम घेण्यात आले.

शहरातील मत्स्योदरी विद्यालयात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनोज मरकड, मुख्याध्यापक पांडुरंग घोगरे, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. समाजभान टीमच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ११० दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला आरोग्यमंत्री राजेश टोपे, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, तहसीलदार विद्याचरण कडवकर, सुनील अंभोरे आदींनी भेट दिली. यावेळी दादासाहेब थेटे, योगेश कव्हळे, शिवाजी बजाज, सुभाष काळे, सातपुते आदी उपस्थित होते. पंचायत समितीत सभापती बापू खटके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी भिसे, पांडुरंग गटकळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी हायस्कूल, डोमेगाव

डोमेगाव येथील धर्मवीर संभाजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक जगन दुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रेखा मिठे, संतोष नाटकर, कल्याण जायभाये, सुभाष माळोदे, दत्तात्रय ढवळे, अरुण काळे, अनिल खंडागळे, तानाजी धुमाळ, एकनाथ मिटकर, गजानन आंजाळे, गणेश चंदेल, सत्यनारायण सोनवणे आदी उपस्थित होते.

जैन इंग्लिश स्कूल

अंबड : शहरातील श्रीमती चंद्रप्रभा स्वरुपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार कासलीवाल, सुरेश काला, शिरीष सावजी, जीवराज बुरले, डॉ. रमेश गंगवाल, प्रवीण बाकलीवाल, संजय चांदीवाल, सुरेश दीडपोळे, राजेंद्र काला, डॉ. नरेश अग्रवाल, डॉ. संतोष मोहळे, चंद्रप्रभू दीडपोळे, संजय विंचुरे, मुकेश सावजी, डॉ. संतोष बाकलीवाल, दीपक पाटणी, भूषण काला, डॉ. अनिल पांडे, मुख्याध्यापक एन. एस. भारद्वाज यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.

Web Title: Various programs in the taluka including Ambad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.