राठोडांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:59+5:302021-01-03T04:31:59+5:30
शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राठोड यांची निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे ...

राठोडांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राठोड यांची निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेश जेथलिया यांची उपस्थिती होती. रविवारी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंना ब्लँकेटचे वाटप, रुग्णांना फळेवाटप केले जाणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रवचन आणि खंजिरी भजनाचा कार्यक्रम दुपारी चार वाजता होणार असून, सायंकाळी सात वाजता गायक नितीन सरकटे यांचा बहारदार मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम तसेच नृत्याविष्कार आयोजित केला आहे.
सुरक्षित अंतर पाळून व मास्क वापरून सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा तसेच सत्कारासाठी कोणत्याही प्रकारचे हारतुरे न आणता शालेय साहित्य, वही, पेन, सॅनिटायझर देवून सत्कार करावा, असे आवाहन आमदार राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, उपनगराध्यक्ष सिराज पठाण, मधुकर मोरे, शरद बोराडे, प्रकाश घुले, सुरेश वाव्हळे, राजेश खंदारे, सचिन राठोड, विजय राठोड, राजेश पवार, डॉ. शरद शेळके आदींनी केले आहे.