चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:38+5:302020-12-26T04:24:38+5:30
देळेगव्हाण : भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. ...

चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
देळेगव्हाण : भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. भोकरदन येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जाफराबाद तालुका युवक अध्यक्ष नितीन शिवणकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कार्यकर्ता मोठा झाला की नेता आपोआप मोठा होतो. राजकारणातील बरेच नेते स्वत:ला मोठे समजतात. मात्र, आपल्या सोबत असणारी प्रत्येक व्यक्ती मोठी व्हावी, यासाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे नेहमीच झटतात. आमदार असताना त्यांनी मतदारसंंघात विकासात्मक कामे केली असून, ती वाखाणण्याजोगी आहेत. त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली आहेत. आमदार असताना व नसतानाही त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत दानवे, ज्येष्ठ नेते सुधाकर दानवे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव, तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, अॅड. रामकृष्ण बनकर, अंकुश जाधव, रघुनाथ पंडित, बाबासाहेब जाधव, अमोल शेळके, दत्तू पुंगळे, भगवान पुंगळे, बळी शिंदे, समाधान पंडित, एकनाथ बुरकुल, शिवाजी बनकर, प्रा. रामदास बनकर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.