विविध हंगामातील पिकांसाठी वरदचे ॲग्रो टेक्नॉलॉजी किट ठरणार शेतकऱ्यांसाठी संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST2021-05-18T04:31:00+5:302021-05-18T04:31:00+5:30
जालना : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. ...

विविध हंगामातील पिकांसाठी वरदचे ॲग्रो टेक्नॉलॉजी किट ठरणार शेतकऱ्यांसाठी संजीवनी
जालना : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. परंतु सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, औषधी दुकानात जाऊन खरेदी करणे अडचणीचे ठरत आहे. ही अडचण लक्षात घेत विविध पिकांसाठी लागणारे विविध घटक आणि औषधांसाठी शेतकऱ्यांची होणारी अडचण आणि धावपळ रोखण्यासाठी जालन्यातील वरद फर्टिलायझर्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी अशी ॲग्रो टेक्नॉलॉजी वरद किट तयार केली आहे. या किटमध्ये सर्व हंगामातील विविध पिकांसाठी लागणाऱ्या औषधे, खतांचा समावेश करण्यात आला आहे.
अत्यंत कमी खर्चात आणि पिकांसाठी आवश्यक असणारे घटक हे एकाच किटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी वरद फर्टिलायझर्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ॲग्रो टेक्नॉलॉजी किट तयार केली आहे. वरद किट मुख्यतः सोयाबीन, तूर, कापूस, मूग, तीळ, उडीद आदी पिकांकरिता बनवलेली आहे. विविध पिकांच्या नियोजनाकरिता लागणाऱ्या घटकांचा या किटमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही किट शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने बुक करण्याची सोयदेखील कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
या वरद किटचे उद्घाटन नुकतेच शेतीतज्ज्ञ डॉ. दिलीप उदासी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते लिखित कृषी तंत्रज्ञानविषयक समृद्ध बळीराजा पुस्तकाचे विमोचन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रमास वरद फर्टिलायझर्स जालना येथे पार पडला. यावेळी वरद ग्रुप व महाराष्ट्र स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानधानी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्रातील जवळपास २९ हजार शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी समृद्ध बळीराजा पुस्तक (उदासी तंत्र) यातील नियोजनाचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा व उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.
.............................