मंगळवारी वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:38 IST2018-03-04T01:38:11+5:302018-03-04T01:38:14+5:30

लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.

Vaishali Samant's musical concert on Tuesday | मंगळवारी वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्ट

मंगळवारी वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीचे काही दिवस शिल्लक असून, महिलांना वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या मंचच्या माध्यमातून दिली जात आहे. यापूर्वी लावणीसह पर्यावरणपूरक होलिकोत्सव, पाकशास्त्र, सांस्कृतिक, नाट्य आदी कार्यक्रम घेण्यात आले. ऐका दाजिबा या गाण्याद्वारे घराघरात पोहोचलेली प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्टचे भारती लॉन्सवर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Vaishali Samant's musical concert on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.