मोरे यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:18+5:302021-02-07T04:28:18+5:30
दानकुंवर विद्यालयात विविध स्पर्धांना प्रतिसाद जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धांना प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना ...

मोरे यांनी घेतली लस
दानकुंवर विद्यालयात विविध स्पर्धांना प्रतिसाद
जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धांना प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य प्रा. डॉ. विजय नागोरी यांच्याहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या पटवारी, डॉ. सुधाकर वाघ, डॉ. झेड. बी. काझी, डॉ. स्वाती महाजन, डॉ. बी. जी. श्रीरामे आदींची उपस्थिती होती.
जालना शहरातील गरजूंना चादरींचे वाटप
जालना : लॉयन्स क्लब ऑफ जालना गोल्ड ग्रुपच्या वतीने शहरातील जुनी औद्योगिक वसाहतीतील गरजूंना चादरी, साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र सोनी, औद्याेगिक वसाहतीचे अध्यक्ष ओमप्रकाश पंच, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, रामकुंवर अग्रवाल, गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट, कोषाध्यक्ष रामनिवास गर्ग, उपाध्यक्ष रामदेव क्षोत्रिय, संरक्षक राजेंद्र भक्कड यांच्यासह पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.