पोलीस, महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:42+5:302021-02-06T04:55:42+5:30
जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. याच ...

पोलीस, महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू
जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. याच धर्तीवर गुरुवारपासून पोलीस दल, महसूल आणि नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, नगरपालिका, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाइनवर काम केले आहे. कोरोनावरील लस प्राप्त झाल्यानंतर या कोरोनायोद्ध्यांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आरोग्य विभागातील १३ हजारावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लसीकरणास सुरुवात झाली. त्यानुसार आजवर ६२८६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दल, महसूल व नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. गुरुवारी दिवसभरात एकूण ४२७ कोरोनायोद्ध्यांना लस देण्यात आली. यात आरोग्य विभागातील १९७ व इतर विभागातील २३० जणांनी लस घेतली. पोलीस, महसूलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
केंद्रनिहाय झालेले लसीकरण
जिल्हा रुग्णालयात ४५ जणांना, मंठा- २६, दीपक रुग्णालय- ३२, जाफराबाद- २८, भोकरदन- ३७, मिशन हॉस्पिटल- ४२, परतूर- ५२, अंबड- ११४, घनसावंगी- ८ तर वरुडी येथील मेडिकल कॉलेजमध्ये ४३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली.