अंबड तालुक्यात ८१ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST2021-08-21T04:34:41+5:302021-08-21T04:34:41+5:30

अंबड : तालुक्यात १३८ गावांमध्ये २ लाख २८ हजार ७३४ लोकसंख्येपैकी आरोग्य विभागाला १ लाख ६० हजार सहाशे एकोणवीस ...

Vaccination of 81,000 citizens completed in Ambad taluka | अंबड तालुक्यात ८१ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अंबड तालुक्यात ८१ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अंबड : तालुक्यात १३८ गावांमध्ये २ लाख २८ हजार ७३४ लोकसंख्येपैकी आरोग्य विभागाला १ लाख ६० हजार सहाशे एकोणवीस लाभार्थींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २० ऑगस्टपर्यंत ८० हजार ८२७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कांगणे यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय, लसीकरण शिबिरालाही वेग आला आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी भेटी देऊन जनजागृती केली. अंबड तालुक्यातील १३८ गावांमध्ये २ लाख २८ हजार ७३४ लोकसंख्येपैकी आरोग्य विभागाला १ लाख ६० हजार सहाशे एकोणवीस लाभार्थींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २० ऑगस्टपर्यंत ८० हजार ८२७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

अंबड उपजिल्हा रुग्णालयांतर्गत २ केंद्रातून २२१२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर जामखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५१३, सुखापुरी ३९२०, गोंदी ३५६०, धनगर पिंपरी ३५१०, वडीगोद्री ३२८५, शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात ४८०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन ६ महिने झाले आहेत. बहुतांश नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता, नागरिक लसीकरणाकडे कानाडोळा करीत आहेत. त्यातच लसीही उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची आवश्यकता आहे.

डॉ. कैलास कांगणे, तालुका आरोग्य अधिकारी, अंबड.

200821\1348-img-20210820-wa0045.jpg

परडा उपकेंद्र अंतर्गत या ठिकाणी लसीकरण केंद्रावरील दृश्य

Web Title: Vaccination of 81,000 citizens completed in Ambad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.